बारामतीची ताकद मतपेटीतून विरोधकांना दिसेल; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास

 

राजकीय दृष्टिकोनातून विरोधी पक्षांनी बारामती लोकसभा मतदारसंघात निश्चित लक्ष घालावे. विरोधकांचे मी स्वागत करेल दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरोधकांना मतपेटीतून ताकद नक्की कळेल असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

सुळे म्हणाल्या, लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आणि हक्क आहे. तेव्हा बारामतीत विरोधी पक्षातील मंडळी राजकीय दृष्टिकोनातून येत असेल तर तो त्यांचा लोकशाहीतील अधिकार आहे. परंतु माझा संविधान आणि जनतेवर विश्वास आहे. आणि या विश्वासाच्या जोरावरच लोकनेते शरद पवार, अजित पवार आणि मी स्वतः आम्ही सामाजिक बांधिलकीतून बारामती लोकसभा मतदार संघात विकासाचे कामे केली आहे. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमीवर विरोधक देखील म्हणतात की विकास करायचा असेल तर तो बारामती लोकसभा मतदारसंघा सारखा झाला पाहिजे.

तसेच विकास कामांची शिदोरी आमच्याबरोबर असल्यामुळे आमच्या मतदारसंघात राजकीय दृष्टिकोनातून कोणीही आलं तर त्यांचा आम्ही मानसन्मानच करू मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोललो तर ईडी कारवाईला सामोरे जावे लागले. ही सूडबुद्धीची उदाहरणे राज्यातील जनता पाहत आहे. मात्र सुडबुद्धी जास्त काळ टिकत नसते. परिणामी येणाऱ्या कालावधीत सूडबुद्धीच्या राजकारणाचा पर्दाफाश झाल्या शिवाय राहणार नाही.

महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी घाई केली मात्र सरकार पाडण्यासाठी इतर राज्याची मदत घ्यावी लागली ही शोकांतिका म्हणावी लागेल . सरकार स्थापन झाल्यानंतर एक महिन्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाली. हे मायबाप सरकार आहे आलिया भोगासी असेच या सरकार बद्दल म्हणावे लागेल. असे शेवटी सुप्रिया सुळे म्हणाल्या

Team Global News Marathi: