कर्जाचे हप्ते न फेडल्याने नितेश राणेंच्या ताफ्यातील गाडीवर बँकेची कारवाई

कर्जाचे हप्ते न फेडल्याने नितेश राणेंच्या ताफ्यातील गाडीवर बँकेची कारवाई

ग्लोबल न्यूज: भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्यावर जिल्हा बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे बँकेतर्फे कारवाही करण्यात आलेली आहे. राणे यांनी काही वर्षापूर्वी इनोव्हा कार आणि इतर १२ गाड्या घेण्यासाठी जिल्हा बँकेतून कर्ज घेण्यात आले होते. मात्र अद्याप वाहनांची रक्कम बँकेकडे जमा झालेली नाही. त्यामुळे आमदार निलेश राणे आणि संबंधित जमीनदारांकडून नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत.

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी यासंदर्भातील कागदपत्रे प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केली. कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्याने संबंधित वाहन मालक आणि जामीनदार वारंवार नोटीसा पाठवूनही थकबाकीची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही काळ उलटल्यानंतर जिल्हा बँकेने संबंधित वाहन मालक आणि जामीनदारांना १०१ ची नोटीस पाठवून गाड्या जप्तीचे आदेश दिले आहेत.

सध्या नितेश राणे फिरवत असलेली गाडी ही रत्नागिरीतील वळंजू यांच्या नावावर असून कणकवलीच्या खोट्या पत्त्यावर सदर गाडीचे कागदपत्रे करून बँकेकडून कर्ज दिले गेले आहे. बँकेने कोणतीही ही खातरजमा न करता वळंजू यांना कर्ज दिले. त्यामुळे बँकेची खोटा पत्ता देऊन फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर खुलासा करणार आहेत.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: