बाळासाहेबांचं ‘ते’ स्वप्न पूर्ण करणार; अजित पवारांचं अभिवादन
ग्लोबल न्यूज: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर सामान्य माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला, असे सांगतानाच महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं.
त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यात येईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं.
महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला.
महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होतं. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.