बाळासाहेब थोरात यांचा नाव न घेता हर्षवर्धन पाटलांना टोला 

नगर | अहमदनगरमधील श्रीगोंदा येथे शिवाजीराव नागवडे पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या समारंभाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. यावेळी नाव न घेता काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला होता.
थोरात म्हणाले की, ‘बापुंनी (स्व. शिवाजीराव नागवडे) कायम काँग्रेसचे विचार जपले.आता राजेंद्र ही तेच करेल. मात्र मधल्या काळात काही मित्रांच्या सोबतीमुळे गडबड झाली होती. अशा परिस्थितीत ही अनुराधा ताई खंबीर राहिल्या. त्यामुळे सुबह का भुला श्यामको घर आया असं आम्ही मानतो.’ बाळासाहेब थोरातांच्या या वक्तव्यानंतर व्यासपीठावर सर्व पक्षीय नेत्यांचा हशा पिकला.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याला संभाळणायच काम एका पिढीने केले. शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, भाऊसाहेब थोरात आणि बापू नागवडे यांनी जिल्हा सांभाळला. अनेक जिल्ह्यात सहकार मोडकळीस आलाय मात्र नगर जिल्ह्यात या पिढीने सहकार जपला व वाढवला. राज्यात ही एका पिढीने नेतृत्व केलं. काही लोक चांगलं कसं मोडायच हे पाहतात. मात्र या मंडळींनी अडचणीत असणाऱ्यांना मदत करणारी ही पिढी आहे. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक नेते व सर्वाधिक कार्यकर्ते आहेत. असं असलं तरी हे व्यासपीठावर वेगळे असले तरी लग्नात शेजारी बसतील अस हा तालुका आहे.
Team Global News Marathi: