‘बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या उदघाटनात डुप्लिकेट वारसदार नव्हते याचा आनंद’

 

नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख हिंदूह्दय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र या लोकार्पण सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. यामुळे आदित्य ठाकरे यांनी आरेतील सावरकर उद्यानात बोलताना मनातील खंत बोलून दाखवली.

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आम्हाला कोणतंही आमंत्रण आलेलं नाही. आम्हाला आमंत्रण का दिलं नाही हे सरकारला तुम्हीच विचारा. महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिलं पण त्यांच्या नातवालाच बोलावलं नाही अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. मात्र यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार निलेश राणे ( यांनी खोचक शब्दात त्यांना डिवचले आहे.

हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे आज लोकार्पण झाले. कार्यक्रमाच्या ठिकाणी बाबासाहेबांचे चायना (डुप्लिकेट) वारसदार दिसले नाही याचा आनंद वाटला, असे म्हणत निलेश राणे यांनी आदित्यला चिमटा काढला. या लोकार्पण समारोहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. एकनाथ शिंदेंनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अनेक बैठका झाल्याची माहिती यावेळी बोलताना दिली.

शिंदे म्हणाले, आज मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या महामार्गाचं लोकार्पण आमच्याच कारकिर्दीत होत आहे. यासाठी खूप अडचणी आल्या. जमीन अधिग्रहणाला खूप विरोध झाला. लोकांना विरोध करायला लावला गेला. हा प्रकल्प होऊ नये, जमिनी दिल्या जाऊ नयेत म्हणून बैठका झाल्या.” एकनाथ शिंदेंनी एकाप्रकारे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढविला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या भाषणातही आधीच्या सरकारने या प्रकल्पासाठी जमिनी मिळू नये म्हणून प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.

 

Team Global News Marathi: