“बाळासाहेबआणि शिवसेनेवर जेवढा अधिकार ठाकरे परिवाराचा तितकाच प्रत्येक शिवसैनिकाचा”

 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत अशातच आता बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे,. संजय राऊतांची भाषा उद्धव ठाकरेनी भाषा बोलू नये. अडीच वर्षात महाविकास आघाडीत आमची कोंडी झाली.

पुढे बोलताना देसाई म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेबद्दल आदारांची भावना त्यांनी आम्हाला पालापाचोळा म्हणून नये. आम्ही शिवसेनेसाठी अनेक वर्षे काम केलं. एकनाथ शिंदेनी वेळोवेळी उद्धव ठाकरेंना कल्पना दिली होती. शिवसेनेचं आमदार राष्ट्रवादीवर नाराज असल्यास वेळोवेळी सांगितलं.

शिवसेना पोखरण्याचं काम सध्या सुरू आहे. बाळासाहेब ठाकरेची शिवसेना वाचवण्याचं आम्ही काम केलं. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय आणि युगपुरुष आहेत. बाळासाहेबांना एका कुटुंबापूर्ती मर्यादीत करू नये. बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर जेवढा अधिकार ठाकरे परिवाराचा तितकाच प्रत्येक शिवसैनिकाचा आहे,असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

संकट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल, जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार

“उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची भाषा बोलू नये, शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंना टोला

Team Global News Marathi: