कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना बजाज कंपनी देणार २ वर्षाचा पगार

सध्या संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा मोट्या प्रमाणात वाढलेली आहे. आज सरकारनी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना आपली सेवा बजावताना अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. या संकटातही बजाज कंपनीने कोरोनामुळे मृत पावलेल्या आपल्या कर्मचारी वर्गासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे.

ज्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना दोन वषार्साठी कंपनीकडून पगार दिला जाईल. याशिवाय, या मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च देखील करण्याचा निर्णय बजाज ऑटो कंपनीने घेतला आहे. पुण्यातील कंपनीच्या प्रमुखांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने दिलेला वैद्यकीय विमा देखील पाच वर्षांसाठी वाढविण्यात येईल. बजाज ऑटोने देऊ केलेल्या इतर जीवन विम्याच्या फायद्यांपेक्षा हे फायदे जास्त आहेत.

बजाज ऑटोने असे म्हटले आहे की, सहाय्य धोरणाअंतर्गत २४ महिन्यांपर्यंत दरमहा मासिक वेतनाची भरपाई ( 2 लाख रुपयांपर्यंत), जास्तीत जास्त दोन मुलांसाठी बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी प्रति मुल वषार्काठी १ लाख रुपयांची मदत आणि पदवीसाठी प्रत्येक वषार्साठी ५ लाख रुपये शैक्षणिक मदत दिली जाईल. तसेच ही मदत निधी १ एप्रिल २०२० पासून आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. ज्यांचा मृत्यू गेल्या वर्षी झाला आहे अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना देखील आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

Team Global News Marathi: