‘बाबू वागस्कर हटवा, पुण्यातील मनसे वाचवा’ पुण्यात मनसेतील वाद चव्हाट्यावर

 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेचे नेते तसेच पुण्यातील माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश माझिरे यांची हकालपट्टी केली होती. त्यामुळे तब्बल ४०० कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. माझिरे यांच्यानंतर आखणी एका बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मनसेने केली आहे. अशातच आता पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर “बाबू वागस्कर हटवा, पुण्यातील मनसे वाचवा.” असे कॅम्पिंग सुरू केले आहे. त्यामुळे पुण्यात मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मनसेचे नेते निलेश माझिरे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितले होते की, “मला कोणतीही कल्पना न देता जिल्हाध्यक्ष पदावरून काढण्यात आले. राज ठाकरे आजही माझे दैवत आहेत. पक्ष किंवा पक्षप्रमुखावर माझी काहीही नाराजी नाही. या मुद्द्यासाठी मी राज ठाकरेंना भेटणार आहे. जर राज ठाकरेंनी पुन्हा संधी दिली; तर पुन्हा काम करणार.” असे ते म्हणाले होते. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेले माझिरे माघारी फिरणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनीसुद्धा मनसेतील अंतर्गत वादाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्यानंतर आता निलेश माझिरे यांनीदेखील ‘बाबू वागस्कर हटाव, मनसे बचाव’ अशी भूमिका घेतली आहे. एकीकडे पक्षबांधणीसाठी राज ठाकरे हे संपूर्ण राज्यात दौरे करत आहेत. तर दुसरीकडे पुण्यात मनसेला खिंडार पडले आहे. यावर आता पक्षातील अंतर्गद वाद मिटवण्यासाठी राज ठाकरे काय निर्णय घेतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: