२०२४ नंतरही ‘ते’ भावी पंतप्रधानच अतुल भातखळकर यांची खोचक टीका !

मुंबई | दोनच दिवसांपूर्वी राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाट बैठक पार पडली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले होते. या भेटीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार चर्चा केली होती. यावर आता भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी भाष्य केले आहे.

२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील., असं खोचक ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. भातखळकर यांनी या ट्विटमध्ये पवारांचं नाव घेतलं नाही. मात्र, त्यांनी पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पवार-प्रशांत किशोर भेटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुणी कितीही रणनीती आखू द्या, आजही मोदी आहेत आणि २०२४ लाही मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचीच सत्ता असेल, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

 

दरम्यान, पवार-प्रशांत किशोर यांच्या भेटीवर राष्ट्रवादीने खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

Team Global News Marathi: