दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळंच निगेटिव्ह दिसते, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया

शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्यावर शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला रोषणाईवर खासदार छत्रपती संभाजीराजेंनी टीका केली होती. आता या टीकेला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिले आहे.

दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं, दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळं निगेटिव्ह दिसेल, असं म्हणत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांना टोला लगावला होता. त्यामुळे या मुद्यावरून दोन्ही खासदार आता आमने-सामने उभे राहिले आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवजयंतीनिमित्त रायगड किल्ल्यावर सध्यांकाळी उशिरा भेट दिली. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या फंडातून करण्यात आलेल्या रोषणाईची पाहणी केली. यावेळी खासदार संभाजीराजेंनी केलेल्या टिकेबद्दल विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले होते.

Team Global News Marathi: