ॲट्रॉसिटी कायद्याचा एवढा दुरुपयोग पाहिला नव्हता, भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी – चंद्रकांत पाटील

 

करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल आढळल्यानंतर त्यांच्या गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर करुणा शर्मा यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शर्मा यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तसेच बुधवारी त्यांच्या सांताक्रूझ येथील घरी बीड पोलिसांनी सर्च ऑपरेशन करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अ‌ॅट्रॉसिटीचा एवढा दुरूपयोग कधीही पाहिली नव्हता. भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी आहे. त्यांना न्यायालयात साथ देणे व त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत भाजप विचार करेल, अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते पुण्यात माध्यामांशी बोलत होते.

“करुणा शर्मा परळी येथे गेल्यानंतर त्यांना गुन्ह्यात गोवण्यात आल. त्यांच्या बनावट आवाजात क्लिप तयार करून व्हायरल करण्यात आली. त्यांच्या गाडीत एक महिला पिस्तूल ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या गाडीच्या चालकावरही अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲट्रॉसिटी कायद्याचा इतका दुरुपयोग कधी पाहिला नव्हता. करुणा शर्मा एकट्या लढत आहेत. अशा स्थितीत भाजपा करुणा शर्मा यांच्या पाठीशी राहील. त्यांना न्यायालयात साथ देणे व त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत विचार करेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: