माझी ताकद १०५ असूनही विरोधात बसलेल्यांना विचारा – संजय राऊत
ग्लोबल न्यूज: सिनेअभिनेत्री कंगना रानौत हिने मुंबईची तुलना पाकव्यात काश्मीर बरोबर केली होती त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तिला चांगलेच झापले होते. त्या वक्त्यव्यावरुन संजय राऊतांनी तिचा हरामखोर मुलगी असा उल्लेख केला होता. राऊतांच्या या टिकेनंतर संपूर्ण विरोधी पक्षाने त्यांच्याविरोधात जंग छेडले होते.
कंगनावर केलेल्या टीकेनंतर दिल्लीतील नेत्यांनी सुद्धा राऊतांना टार्गेट केले होते. अनेकांनी राऊतांनी माफी मागावी असा सूर आवळला होता. यावर पुन्हा एकदा राऊत यांनी सूचक ट्विट करत विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. “माझी ताकद काय आहे हे त्यांना विचारा ज्यांच्याजवळ १०५ आमदार असून सुद्धा विरोधात बसण्याची वेळ आली आहे.. जय महाराष्ट्र ! असे ट्विट राऊत यांनी आज केले आहे.