अशा पद्धतीचे आदेश राज्यपालांनी का काढावेत? नाना पटोले यांची घणाघाती टीका

 

राज्यात सुरू असलेल्या राजकीय आंदोलनानंतर विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत एकनाथ शिंदे गटातील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी अल्पमतात आली असल्याचा दावा करत यावर राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासंदर्भातील पत्र पाठवले असून सरकारला उद्या (गुरुवारी) बहुमत सिद्ध करायचे आहे. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले आहे.

राज्यपालांनी या प्रकरणावर घेतलेली भूमिका खेदजनक आहे. शिवसेनेने आपला गटनेता बदलला आहे. मग उद्या विधानसभेत कुणाचा व्हीप लागू होईल? राज्यपाल विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत वेगळी भूमिका घेतात. मग काल रात्रीतून असं काय घडलं? बहुमत सिद्ध करण्यासाठी ४८ तासांची मुदत देत अशा पद्धतीचे आदेश राज्यपालांनी का काढावेत? हा चमत्कार आहे. असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: