आवताडे यांचा विजय स्पष्टपणे दिसत असल्याने अजित पवार यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे-चंद्रकांत पाटील

पंढरपूर : राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असा विचार त्यांनीही कदाचित केला नसेल. मात्र, उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री का झाले याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी टोला लगावला आहे.

शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. त्यांनी जर उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन सरकार स्थापन जरी केलं असतं आणि उद्धव ठाकरे स्वतः पदावर नसले असते तरीही ठाकरेंनी सरकारवर टीका करणे सोडले नसते आणि त्रास दिला असता. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडल्याचे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे हे केवळ एका पक्षाचे प्रमुख होण्यासाठी जन्माला आले असताना त्यांच्यावर मुख्यमंत्री होण्याची वेळ आली आहे, त्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. त्यांना परिस्थिती समजून घेण्यासाठी स्वतः तळागाळात पोहोचावे लागेल. तेव्हा ही परिस्थिती त्यांना कळेल, असाही टोला त्यांनी लगावला.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय स्पष्टपणे दिसत असल्याने अजित पवार यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित असल्याने अजित पवार राज्यात कोरोनाची एवढी भीषण परिस्थिती असतानाही गेली २ दिवस पंढरपुरात सभा घेत आहेत. या प्रचार सभेत त्यांच्या पायाखालच्या जमिनीसोबत त्यांची जीभही घसरत चालली आहे, असाही टोला त्यांनी लगावला.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: