बाप्पाच्या विसर्जनासाठी वडाळा आणि दादर (पूर्व) येथे कुत्रिम तलाव….!
आरोग्य समिती अध्यक्ष, नगर सेवक अमेय घोले यांच्या संकल्पनेतून महर्षी कर्वे उद्यान, वडाळा स्टेशन रोड येथे बाप्पाच्या विसर्जनासाठी कुत्रिम तलाव बांधण्यात येणार आहे. नुकतेच या तलावाच्या बांधकामाचे उदघाटन समारंभ सर्व शिवसैनिक व पधाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गमुळे यंदा गणेशोत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. याच पाश्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच नगरसेवक अमेय घोले यांच्या संकल्पनेने व मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने सार्वजनिक आणि घरगुती गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, गणेश मूर्ती संकलन केंद्र (पिक अप पॉईंट) व गणेश मूर्ती घरून on Appointment पिक अप हि सेवा प्रभाग क्र. १७८ च्या रहिवाश्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
विसर्जनाच्या दिवशी (१) सहकार नगर मनपा शाळा, वडाळा आणि (२) विसंजी पार्क मैदान, दादर (पूर्व) येथे गणेश मूर्ती स्वीकारल्या जातील अशी माहिती अमेय घोले यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तसेच On Appointment पिक अप सुविधा सुद्धा ठेवण्यात आलेली आहे.
या सुविधांद्वारे दिलेल्या २४०८ ४००० क्रमांकावर संपर्क करून आपण Advance Appointment ची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. सदर गणेश मूर्तीचे कुत्रिम तलावात किंवा समुद्रात विसर्जन करण्यात येण्याची महती सुद्धा देण्यात आलेली आहे.