अर्णव गोस्वामींच्या जामिनामुळे वृत्तपत्र स्वातंत्र्यचा मोठा विजय झाला: अतुल भातखळकर

अर्णव गोस्वामींच्या जामिनामुळे वृत्तपत्र स्वातंत्र्यचा मोठा विजय झाला: अतुल भातखळकर

मुंबई: भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामींना अंतरिम जामीन मिळाल्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे, की अर्णब गोस्वामी यांना न्यायालयाने दिलेला जामीन म्हणजे हा लोकशाहीचा आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यचा खूप मोठा विजय आहे.

सूडबुध्दीने आणि अहंकाराने वागणाऱ्या या महाभकास आघाडी सरकारला ही मोठी चपराक आहे. शेवट पर्यंत अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळू नये असं या सरकारला वाटतं होतं. हे सरकार खोट्या केस टाकून रिपब्लिक टीव्ही बंद करण्यासाठी हा एक अघोरी आणि हिटरलशाहीचा प्रयत्न होता.

 

मात्र सुप्रीम कोर्टाने आज तो उधळून लावला आहे. ही सर्वांत आनंदाची बाब आहे. या सरकारच्या दडपशाही विरोधात भाजप सतत आवाज उठवत राहणार आहे. विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेरही मी या प्रश्नांवर आवज उठवणार आहे. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: