नाव – शिवाजी गंगाराम इंगळे
पेशा- शेतकरी
पत्ता- मु.पो. राजुरा बु!!, ता. मुखेड, जि. नांदेड
फोन नंबर- 7709410990
🟢 जुगाडाचे नाव – हरभरा व तुर शेंडे खुडणी यंत्र
🟢 कल्पना कशी सुचली
मजूर काम करणाऱ्या मजुरांकडून हाताने शेंडे खुडणे परवडणारे नसल्याने मी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून हे जुगाड यंत्र बनवावे असं सुचलं.
🟢 जुगाड बनविण्यासाठी धडपड आणि अडचणी
अशा गोष्टी पूर्वी बनविल्या नसल्याने आणि त्यातील तांत्रिक ज्ञान कमी असल्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची नावे माहीत नव्हती, परंतु यात शोध करत गेल्यावर सगळे शक्य झाले.
🟢 जुगाडाचा वापर कसा केला
१. हरभरा व तुर शेंडे खुडणी यंत्र वापरल्याने तीन वेळा शेंडे खुडणे शकय झाले.
२. हरभरा व तुर शेंडे खुडणी यंत्र जुगाडाचा वापर करून साधारण १ ईंचपर्यंतचे शेंडे हे खुडता येतात आणि शेंड्यावर पकडुन शेंडे काढले जातात.
🟢 साहित्य काय वापरले
१. पाऊन इंची पाईप
२. एक एलबो
३. एक बंद कॅप
४. बारा होल्ड डी.सी मोटर
५. तीन थर्माकोल कटर
६. वायर
७. चार्जिंग बॅटरीला जोडणारी पीन
८. एक बटन
९. एक फेव्हीकिक
१०. दोन मेल फीमेल पिन
🟢 जुगाड कसं बनवलं
१. सुरवातीला मोटार एलबोमध्ये चिटकवुन घेतली व वायरला डाग दिला.
२. पाईपला एलबो जोडला व त्या पाईप मधुन वायर काढून नंतर पाईप मध्ये बटन बसवले.
३. पाईपच्या शेवटी गाठ मारली व बंद कॅप चिटकवुन घेतली.
४. चार्जिंगसाठी आवश्यक असते ती पीन जोडुन घेतली.
५. एक मोठा वायचर साइज पत्रा घेऊन सेंटरला एक शेंड्यावर समान अंतरावर तीन होल मारुन घेतली
६. सेंटरच्या होलमध्ये वेल्डरकडुन गॅस वेल्डिंगने भरुन घेतली.
७. मोटर च्या समोरच्या टोकाला तीन थर्माकोल कटर नटबोल्टने फीट केले यंत्र तयार झाले
🟢 जुगाड साठी आलेला खर्च
४०० रुपये फक्त
🟢 जुगाडाचे फायदे
१. मला या जुगाड यंत्रामुळे वेळ व मजुरांच्या मजुरीच्या दिल्या जाणाऱ्या पैशाची बचत झाली.
२. जे काम १५ माणसे करत नाही ते काम एका दिवसात शक्य झाले.
३. शेंडे खुडल्यामुळे फाटे जास्त आले व उत्पन्नात वाढ झाली.
साभार द फार्म