आंतरजातीय प्रेमविवाह करणाऱ्या २० वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या

युक्ता ज्या इमारतीत राहत होती त्याच इमारतीत राहणाऱ्या हर्षल संकपाळ या तरुणाशी तिचे सुत जुळले. मात्र, दोघांच्या प्रेमसंबंधाला हर्षलच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे हर्षल आणि युक्ता यांनी लपून लग्न केले होते. युक्ता मागासवर्गीय असल्याने हर्षलच्या घरच्यांचा या लग्नास विरोध होता. मात्र, तरीदेखील हर्षलने घरच्यांच्या विरोधात जाऊन तिच्याशी विवाह केला.

मुंबई मागासवर्गीय जातीचे असल्यामुळे सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. चेंबूर कॅम्प परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याप्रकरणी विवाहितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरसे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून मुलीच्या पतीसह सासू-सासरे आणि नणंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युक्ता असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

युक्ता ज्या इमारतीत राहत होती त्याच इमारतीत राहणाऱ्या हर्षल संकपाळ या तरुणाशी तिचे सुत जुळले. मात्र, दोघांच्या प्रेमसंबंधाला हर्षलच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे हर्षल आणि युक्ता यांनी लपून लग्न केले होते. युक्ता मागासवर्गीय असल्याने हर्षलच्या घरच्यांचा या लग्नास विरोध होता. मात्र, तरीदेखील हर्षलने घरच्यांच्या विरोधात जाऊन तिच्याशी विवाह केला.

राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या दोघांनी विवाह केल्यानंतर हर्षलच्या घरच्यांना समजले. ते दोघेही चेंबूर कॅम्प परिसरात रूम भाड्याने घेऊन राहत होते. 25 जुलै रोजी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा हर्षलने युक्ताला मारहाण केली. त्यानंतर 26 जुलैला युक्ताने राहत्या घरात गळफास लावूनआत्महत्या केली. त्या दिवशी युक्ता राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. युक्ता ही मागासवर्गीय असल्यामुळे सासरच्या मंडळींचा तिला नकार होता.

Team Global News Marathi: