शिवसेनेचे आणखी सहा आमदार नॉटरीचेबल एकनाथ शिंदेंकडे 50 आमदार

शिवसेनेचे आणखी सहा आमदार नॉटरीचेबल एकनाथ  शिंदेंकडे 50  आमदार

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेचा निकाल लागताच शिवसेना आमदारांना घेऊन पक्षाविरोधात बंड पुकारला आहे

राज्यातील शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या शिवसेना आमदारांना भावनिक साद घातली.  त्यानंतरही शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसत आहे. शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रिचेबल आहेत. हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून ते आज गुवाहाटीला पोहोचतील अशी माहिती आहे. आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar), सदा सरवणकर (Sada Sarvankar), दादा भुसे (Dada Bhuse), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), संजय राठोड (Sanjay Rathod) आणि दिलीप लांडे (Dilip Lande) यांच्याशी संपर्क झालेला नाही.

मंगेश कुडाळकर हे मुंबईतल्या कुर्ला नेहरुनगरचे शिवसेना आमदार आहेत. तर सदा सरवणकर हे मुंबईतल्याच दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार आहेत. दिलीप लांडे हे मुंबईतील चांदिवली मतदारसंघाचे, दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघाचे, दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघाचे आणि संजय राठोड हे दिग्रस मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. त्यामुळे आता सरकारचं काऊंटडाऊन सुरु झाल्याचं म्हटलं जात आहे.

त्यामुळे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आता 44 शिवसेनेचे आमदार आणि सहा अपक्ष आमदार असे मिळून 50 आमदार झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदनंतर आमदार सदा सरवणकर आणि मंगेश कुडाळकर यांचे फोन नॉट रिचेबल लागत आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान वर्षा सोडल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या दोन आमदारांनंतर एकनाथ शिंदेंच्या गोटातील आमदारांची संख्या आता 40 च्या वर पोहोचली आहे. दरम्यान या दोन्ही आमदारांनी काल बंडखोर आमदारांवर टीका केली होती.

शिवसेनेचे 55 आमदार असून यातील दोन तृतीआंश पेक्षा अधिक आमदार म्हणजे 37 पेक्षा अधिक आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसोबत आहेत, त्यामुळे शिदेंच्या गटाला अधिकृत मान्यता देण्याबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निर्णय घ्यावा लागला.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेचा निकाल लागताच शिवसेना आमदारांना घेऊन पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यानंतर राज्यात राजकीय नाट्याला सुरुवात झाली. शिवसेनेचे तब्बल 30 ते 35 आमदार रातोरात गुजरातच्या सुरतमधील एका हॉटेलमध्ये पोहचले. यानंतर सुरतमार्गे गुवाहाटीला रवाना झाले. मविआ सरकार सोडून भाजपासोबत सरकार स्थापन करा अशी मागणी शिंदेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान शिंदेंच्या गटात आता 41 पेक्षा जास्त आमदार झाले असून लवकरचं राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील राजकारणात नेमके काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: