मातोश्रीवर आणखी एक जण कोरोना बाधित; रश्मी ठाकरेंना कोरोनाची लागण

मुंबई – राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत (Coronavirus in Maharashtra) असताना कोरोनाचा विषाणू आता थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काल रात्री रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, त्या घरीच क्वारेंटाइन झाल्या आहेत. (CM Uddhav Thackeray’s wife Rashmi Thackeray Tested corona positive )

रश्मी ठाकरे यांची प्रकृती उत्तम असून, त्या घरीत क्वारेंटाइन झाल्या आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. रश्मी ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीला व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे उपस्थिती लावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. मात्र, गेल्या महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जनतेला काळजी घेण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं. विशेष म्हणजे कोरोना काळात स्वत: मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व शहरांचा आढावा घ्यायचे आणि अधिकाऱ्यांना सूचना द्यायचे. मात्र, तरीही दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झालाय.

आदित्य ठाकरे यांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक लोकांना भेट दिली. अनेक विकास कामांचे उद्घाटन त्यांनी केले. याशिवाय सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक लोकोपयोगी कामे केली. मात्र, हे सर्व काम करत असताना ते कदाचित कोरोनाबाधिताच्या संपर्कात आले असावेत त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: