अंनिस’ विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री वादात भाजपच्या या नेत्याची उडी

 

बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्रीसध्या प्रचंड चर्चेत असून ‘अंनिस’ संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराजांना आवाहन दिल्यानंतर अनिस विरुद्ध धीरेंद्र कृष्ण शास्त्री असा वाद सुरु असतानाच आता या वादामध्ये भाजपा नेत्याने उडी घेतली आहे. नागपूरमधील कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेधीरेंद्र कृष्ण शास्त्रींना जाहीर आव्हान दिल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढल्याचा दावा केला आहे. ‘अंनिस’ने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना तुमच्याकडे असणारी दैवीशक्ती सर्वांसमोर दाखवा असं जाहीर आव्हान दिलं असून हे आव्हान धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी स्वीकारलं आहे. वाद सुरु असतानाच आता मध्य प्रदेशमधील भाजपाच्या एका नेत्याने धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना पाठिंबा दिला आहे.

मध्य प्रदेशमधील मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी बागेश्वर धामचे पीठाधीश असलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना समर्थन दिलं आहे. विजयवर्गीय यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. सनातन धर्मामध्ये अनेक हिंदू महात्मा होऊन गेले, असंही विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी रात्र संत श्री टाटमबरी सरकार यांच्या दर्शनासाठी विजयवर्गीय बडवाह येथे आले होते. त्यावेळी त्यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री प्रकरणासंदर्भात भाष्य केलं.

मी बाबांची मुलाखत पाहिली आहे. हिंदू संत धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी हा माझा चमत्कार नसून माझ्या इश्वराचा चमत्कार आहे. माझा हनुमान आणि सन्यास घेतलेल्या बाबांवर विश्वास आहे. सर्वकाही त्यांच्या कृपेने होतं. मी तर त्यांचा छोटासा साधक आहे, असं विजयवर्गीय म्हणाले. हिंदू महात्मांबद्दल असं काही झालं की लोक प्रश्न उपस्थित करतात. जावरा येथील दर्ग्याबद्दल आजही कोणी प्रश्न उपस्थित करत नाही. तिथे लोक जमीनीवर लोळतात, त्यांना मारलं जातं मात्र त्याची चर्चा होत नाही, असं विजयवर्गीय म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: