अनिल परबांनी आता तरी पराभव मान्य करावा काँग्रेसच्या आमदाराने सुनावले खडेबोल

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र सरकार चालवताना दासींना आहे. मात्र विविहद मुद्द्यावरून या तीन पक्षाच्या नेत्यांमध्ये वाद होताना दिसत आहे. त्यात आता थेट काँग्रेस आमदार ईशान जिशान याने शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप लगावत आता तरी मतदार संघात झालेला पराभव स्वीकारावा असे आव्हान त्यांनी थेट शिवसेनेच्या मंत्र्याला दिले आहे.

परीवहन मंत्री अनिल परब माझ्या कामात अडथळा आणत असल्याचा आरोप वांद्रे पूर्व मतदारसंघाचे काँग्रेस आमदार जिशान सिद्धकी यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत मंत्री अनिल परब यांनी वांद्रे पूर्व विधानसभेतील आपला पराभव आता तरी मान्य करायला हवा. जर याबाबत काहीच झालं नाही तर मला हा विषय विधानसभेत उभा करावा लागणार आहे, असा इशाराही जिशान सिद्धकी यांनी दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, जनतेने मला कौल दिला आहे. मला माझ्या मतदारसंघात कामे करू द्यात. जाणीवपूर्वक मला विविध ठिकाणी टाळण्याचा अनिल परब यांनी जो प्रयत्न सुरू ठेवला आहे. हे त्यांना शोभणारे नाही. ते वरिष्ठ मंत्री आहेत. माझ्या मतदार संघात मी करत असलेली छोटी छोटी कामे देखील केवळ वर्षभर एनओसी न मिळाल्यामुळे पडून आहेत. मी आत्तापर्यत याबाबत माझे सर्व वरिष्ठ नेते यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांच्या पर्यंत ही गोष्ट पोहचवली आहे.

महाविकास आघाडी चांगलं काम करत आहे. परंतु, अनिल परब सारखे काही नेते आहेत जे जाणीवपूर्वक असे प्रकार करत आहेत. यासाठी मला आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी बोलावं लागलं आहे. आदित्य ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी या प्रकरणात थोड्याफार प्रमाणात सुधारणा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल परब यांनी लक्ष्यात घ्यायला हवं की मला लोकांनी बहुमत दिलं आहे. त्यांनी त्यांची हार आता तरी मान्य करायला हवी. जर याबाबत काहीच झालं नाही तर मला हा विषय विधानसभेत उभा करावा लागणार आहे.

Team Global News Marathi: