संपामुळे सतावर्तेंचं नुकसान होत नाही, अनिल परब यांनी डागली तोफ

 

मुंबई | एसटी महामंडळाचर राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राज्य एसटी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन पुरकरण्यात आले आहे. अशातच आता पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्याचे आव्हान परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. तसेच नं परतणाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे.

आज तागायत १० हजारपेक्षा अधिक कर्मचारी निलंबित झाले आहेत. अडीच हजारापेक्षा अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. प्रशासन कारवाईचं एकएक पाऊल पुढे टाकत आहे. जे निलंबित झालेत त्यांची बडतर्फी होऊ शकते. अशी माहिती आता परिवहन खात्याकडून देण्यात येत आहे.

यावर बोलताना परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, सरकारला अशी कारवाई करण्याची बिलकूल इच्छा नाहीये. परंतु लोकांना वेठीला धरून अत्यावश्यक सेवा वेठीला धरली जात असेल तर सरकारही हातावर हात ठेवून बसणार नाही. सरकार सर्व पर्यायांचा विचार करत आहे. ते वापरावे लागतील, असं अनिल परब यांनी सांगितलं. तसेच संपामुळे सतावर्तेंचं नुकसान होत नाही असा टोला सुद्धा गुणरत्न सदावर्ते यांना लगावला आहे.

Team Global News Marathi: