अनिल परबांच्या अडचणीत वाढणार, ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती !

 

मुंबई | अनिल परब यांच्यावरती राज्यात सात ठिकाणी ईडीने छापेमारी केली. त्यावेळी शिवसेना पक्षातील अनेक नेत्यांनी आम्ही तुमच्यासोबत असल्याचे जाहीरपणे सांगितले. सध्या ईडीच्या हाती दापोलीतील साई रिसॉर्टच्या करारा संदर्भात मुरुड ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती लागल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 26 जून 2019 ला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

छापेमारीदरम्यान दापोलीतला रिसॉर्ट आपला नसल्याचा अनिल परबांनी दावा केला होता. विशेष म्हणजे ईडीच्या हाती जे पत्र लागलं आहे, ते कर आकारणीसाठी लिहीलं होतं. राज्यात अनिल परब यांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापेमारी केल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती.

शिवसैनिकांना वाटतं की इडी गटारीच्या पाण्याची पाहणी करण्यासाठी गेली होती, संजय राऊत अनिल परब काय बोलतात. शिवसेनेनं मुंबई पालिकेला गटारच केलंय. इडी ग्रामपंचायतीत गेली होती तिथं ते चार तास बसले, अनिल परबचं जे पत्र होतं. ते 26 जून 2019 चं त्यांच्या हाती लागलं आहे. संबंधित रिसॉर्टला माझ्या नावाने करण्यासाठी अनिल परबने ग्राम पंचायतीस पत्र लिहीलंय आहे. तसेच त्याचा टॅक्स देखील भरला आहे असं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.

अनिल परबांना सांगा, की तुमच्या नावाचं पत्र जर इडीच्या हाती लागलं तर सांगा. जेलचे दरवाजे दिसत आहेत का ? मी हायकोर्टात पेपर दिलेयत, जमिन माझी आहे, सगळे कागदपत्रं मी केर्टात दिले आहेत, अनिल परबचा रिसॉर्टसाठी करोडो रुपये खर्च झालेयत, काय होणार परब ? अशी प्रतिक्रिया आज किरीट सोमय्यांनी मिडीयाला दिली आहे.

Team Global News Marathi: