अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव, चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली शंका

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुखांनी सूचक ट्विट केले आहे. चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी देशमुखांनी केली आहे. मात्र यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.

ट्विटमध्ये पाटील म्हणाले आहेत की, “अनिल देशमुखांकडून २१ तारखेला पत्र लिहून घेतले गेले. ते ४ दिवस प्रलंबित ठेऊन २४ तारखेला प्रसिद्ध केले.१०० कोटींच्या वसुलीचे आरोप व पत्रात व्हाट्सअँप-एसएमएसची भाषा. पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न? अनिल देशमुखांवर तोंड उघडू नको म्हणून वरिष्ठांचा दबाव…नाही तर…??” असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हंटले आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये वाचा

“मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते,” असे गृहमंत्र्यांनी ट्विट केले आहे.

Team Global News Marathi: