अनिल देशमुख यांची तब्बल नऊ तास चौकशी
शंभर कोटी खंडणी प्रकरणात अनिल देशमुख यांची सुरू आहे चौकशी
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज दिवसभर डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी सचिन वाझे ला शंभर कोटी रुपये दर महिन्याला गोळा करायला सांगितले होते, हे आरोप देशमुखांवर ठेवण्यात आले आहेत. आज त्यांच्या चौकशीचा पहिला दिवस होता.
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्याविरोधात अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.
सीबीआयला पंधरा दिवसात प्राथमिक चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सीबीआयने प्राथमिक चौकशी सुरू केली असून बुधवारी अनिल देशमुख यांच्या चौकशीचा पहिला दिवस होता. सीबीआयला पाच एप्रिल रोजी आदेश देण्यात आले होते. प्राथमिक चौकशी पूर्ण करण्यासाठी सीबीआयकडे अजून पाच ते सहा दिवस असू शकतात.