अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येणार नाही, भाविकांसाठी दारे बंद

राज्यात विशेष करून मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकार आणि मुंबई मनपाच्या चिंतेत अधिक भर घालत आहे. तसेच मुंबई मनपाने कोरोना संदर्भातील नियम अधिक कडक केले आहे.

त्यातच संपूर्ण मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिराच्या भाविकांसाठी महत्वाची बातमी पुढे आली आहे. मंदिर प्रशासनाने अंगारकी चतुर्थी दिवशीचे ऑफलाइन दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

२ मार्च रोजी अंगारकी चतुर्थी आहे. यादिवशी कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता भाविकांच्या दर्शनावर निर्बंध आणले आहेत. ज्यांना दर्शनाची परवानगी आहे, त्यांना देखील सकाळी ८ ते रात्री ९ दरम्यानच दर्शन घेता येणार आहे. मात्र इतर भक्तांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.

Team Global News Marathi: