अंगाला खाज येण्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय, मिळेल तात्काळ आराम

 

मुंबई | अंगाला खाज सुटण्यामागे अनेक कारणे असू शकतात. भाग १ मध्येच ती सर्व कारणे आपण जाणून घेतली. यानंतर आता आपण अंगाला खाज येण्यावर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. ज्यांच्या सहाय्याने आपण या समस्येतून लवकर आराम मिळवू शकतो तसेच अंगाला खाज येऊन होणाऱ्या जखमेपासून सुटकारा मिळवू शकतो.

१) नारळाचे तेल
फायदा – कोरड्या त्वचेला जास्त खाजेचा त्रास होतो. त्यामुळे कोरड्या त्वचेवर जर नारळाचे तेल लावले तर त्वचा नैसर्गिकरित्या कोमल आणि मुलायम राहते. परिणामी खाज येत नाही आणि येत असेल तर थांबते.

२) तुळस
फायदा – तुळस अत्यंत गुणकारी औषधी आहे. यातील अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म त्वचेचे रक्षण करतात. यामुळे अंगाला खाज येत असेल तर तुळशीचा वापर गुणकारी ठरतो.

३) कडुलिंबाची पाने
फायदा – कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटि बॅक्टेरियल आणि अँटि फंगल गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचेची खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात.

४) कोरफड जेल
फायदा – कोरफडमध्ये मॉईस्चराईजिंग आणि अँटिएजिंग गुणधर्म असतात. यामुळे कोरडी त्वचा तसेच वाढत्या वयामुळे अंगाला येणारी खाज दूर होते.

५) पेपरमिंट ऑईल
फायदा – पेपरमिंट ऑईल हायब्रिड पुदिन्यापासून तयार केले जाते. हे इसेन्शियल ऑईल आहे. यामुळे खाज- खुजलीच्या समस्यांवर पेपरमिंट ऑइल अत्यंत गुणकारी आहे.

६) लिंबाचा रस
फायदा – लिंबामध्ये अँटि एजिंग गुण असतात. हे वाढत्या वयानुसार त्वचेवर येणाऱ्या खाजेच्या त्रासासाठी उपयुक्त असतात. तसेच लिंबातील विटामिन सी हे त्वचेवरील खाज आणि सूज यांसारख्या समस्येवर गुणकारी आहेत.

Team Global News Marathi: