अंधेरी पोटनिवडणुक: राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केली ही विनंती

अंधेरी पोटनिवडणुक: राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केली ही विनंती
 मुंबई :  अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत एक ट्विस्ट आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला ही पोटनिवडणूक न लढण्याची गळ घातली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. म्हणून उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. भाजपने आपला उमेदवारही जाहीर केला आहे. आता राज ठाकरे यांनी भाजपला ही निवडणूक न लढवून बिनिविरोध करावी अशी विनंती केली आहे.

(dont contest andheri east bypoll make it unopposed mns chief raj thackeray appeal to bjp leader devendra fadanvis)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून म्हटले आहे की, शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारे जाहीर केली आहे. रमेश लटके हे चांगले कार्यकर्ते होते, त्यांनी शाखा प्रमुखापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी साक्षीदार आहे. ऋतुजा लटके आमदार झाल्यास रमेश लटके यांच्या आत्म्यास शांती मिळेल असे राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की भाजपने ही पोटनिवडणूक लढवू नये. तसेच आमदाराचे निधन झाल्यास आम्ही शक्यतो निवडणूक लढवत नाही, तुम्हीही हेच धोरण स्विकारावे असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.

भाजपकडून मूरजी पटेल यांना उमेदवारी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मूरजी पटेल यांनी रमेश लटके यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यात पटेल यांचा पराभव झाला होता. आता २०२२ च्या पोटनिवडणुकीत पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला असून भाजपने त्यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. शिंदे गटाने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला असून मनसेची या निवडणुकीत काय भूमिका असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कालच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. आरोग्य प्रश्नावर ही भेट घेतल्याचे मनसेने म्हटले होते.

शिवसेनेकडून स्वागत

मनसेच्या या भूमिकेचे शिवसेनेने स्वागत केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: