आनंदवार्ता: कोव्हीशील्ड’ या पहिल्या भारतीय बनावटीच्या कोरोना लसीला मिळाली परवानगी

सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावालांनी मानले मोदींचे आभार

मुंबई: सिरम इन्स्टटयूटचे मालक आदर पुनावाला यांनी भारतीय बनावटीच्या ‘कोव्हीशील्ड’ या लसीला आपत्कालीन स्थितीत वापरायची परवानगी मिळाल्याची आनंदवार्ता देण्यास ट्विट केले व यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुद्धा आभार मानले.

 

बहुचर्चित आणि बहुपेक्षित ठरलेली हि लस निर्मितीप्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात असताना पंतप्रधानांनी पुण्यातल्या सिरम इन्स्टूट्यूटला भेट सुद्धा दिली होती. आणि यानंतर कोरोनाची लस लवकरच भारतात येईल अशी सकारात्मक आशा सुद्धा व्यक्त केली होती.

गेले अनेक महिने सगळेचजण ज्या गोष्टीची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत त्या कोव्हीशील्ड लसीला आता परवानगी देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत हि लस वापरता येणार असल्याचं स्वतः आदर पुनावाला यांनी सांगितले आणि त्यासाठी पंतप्रधानांचे सुद्धा आभार मानले आहेत. कोरोनाग्रस्त व्यक्ती लवकर बरा व्हावा यासाठी हि लस येणे अत्यंत आवश्यक होते. याशिवाय हि लस भारतीय बनावटीची असल्याने त्याचे वेगळे महत्व प्रत्येकासाठी असणार आहे.

कोव्हीशील्ड प्रमाणेच इतरही काही कंपन्यांच्या लसींच्या चाचण्या सध्या अंतिम टप्प्यात आहेत. आणि लसींच्या वापराच्या संदर्भात आवश्यक त्या परवानग्या मिळवण्याच्या सुद्धा प्रक्रियेत आहेत. भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना या भारतीय बनावटीच्या लसीला मिळालेली परवानगी निश्चितच सकारात्मक आशा देणारी ठरणार आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: