….अन मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का’; नागपुरात फडणवीसांच्या घराशेजारी झळकले भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर

 

नागपूर | मागच्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचेनेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या सासरवाडीत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले होते. तर आता तिकडे देवेंद्र फडणवीस याचे भावी मुख्यमंत्री म्हणून नागपूरात बॅनर झळकले आहेत. मात्र आता अजित पवारांचे बॅनर नागपुरातही झळकत आहेत. त्यावरून आता राजकारणात नवा वाद निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.

नागपुरात अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले आहे. लक्ष्मी भवन चौकात अजित पवार यांचे बॅनर झळकले आहेत. हा चौक देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. बॅनवर ‘वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का’, असे लिहिलेले आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले आहेत. दुसरीकडे अमित शहा आज नागपूरात दाखल होणार आहे. मात्र त्याआधीच हे होर्डिंग्ज लावण्यात येत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा आहे. त्यातच नागपूर बॅनर झळकल्याने भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याच्या चर्चां उधाण आलं आहे. या अगोदर शहरातील बुटीबोरी परिसरात ठिकठिकाणी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार, अशा आशयाचे होर्डिंग्ज लागल्याचं दिसून आले होते. बुटीबोरी नगर परिषदेचे अध्यक्ष बबलू गौतम यांनी हे होर्डिंग्ज शहरात लावले होते.

Team Global News Marathi: