राज्यात दिवसभरात 11 हजार 852 नव्या बाधितांची वाढ;184 मृत्यू

ग्लोबल न्यूज – महाराष्ट्रात आज 11 हजार 158 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच, राज्यात आज 11 हजार 852 नव्या बाधितांची वाढ झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 7 लाख 92 हजार 541 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण 5 लाख 73 हजार 559 बरे झालेल्या रुग्णांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहे.

राज्यात सध्या 1 लाख 94 हजार 056 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.37 टक्के झाले आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 41 लाख 38 हजार 939 नमुन्यांपैकी 7 लाख 92 हजार 541 नमुने पॉझिटिव्ह (19.14 टक्के) आले आहेत.

राज्यात 13 लाख 55 हजार 330 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 722 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 184 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.1 टक्के एवढा आहे.

राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत नवीन निमयावली जाहीर केली असून राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे.

अभिनेता सुबोध भावेला कोरोनाची लागण, घरीच केले स्वतःला क्वारंटाइन; संपूर्ण कटुंब कोरोनाबाधित

मात्र, मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे.

राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत चित्रपटगृह बंदच राहतील तसेच, मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा केलेली नाही. स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, मॉल्समधील थिएटर, बार, ऑडिटोरिअम इत्यादी जागा पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.

मिशन बिगीन अगेन: ठाकरे सरकारची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरू-काय बंद

ग्लोबल न्युज नेटवर्क: