उक्कडगाव येथे वृद्ध दाम्पत्याची अज्ञात कारणावरूण आत्महत्या
बार्शी : उक्कडगाव ता बार्शी येथील वयोवृद्ध दाम्पत्याने राहत्या घरात अज्ञात कारणावरूण स्वतः गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला.
प्रभाकर पंढरी मुळे वय 65 व मुक्ताबाई प्रभाकर मुळे वय 60 दोघेही रा. उक्कडगाव अशी स्वतः गळफास लावून घेऊन आत्महत्या केलेल्या पती पत्नीचे नाव आहे.वृद्ध पती पत्नीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्यामुळे बार्शी तालुक्यात खळबळ उडाली आहे. मात्र आत्महत्येचे मुळ कारण अजुन गुलदस्त्यात असुन त्याचा शोध घ्यावा असे बोलले जात आहे.
दिपक बजरंग मुळे,वय 42 रा.उक्कडगाव यांनी याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात घटनेची खबर दिली आहे. खबरीत म्हटले आहे की ते उक्कडगाव येथील एस टी स्टॅन्ड मध्ये बसले असता अच्युत मुळे हे एस टी स्टैंड येथे आले व ते म्हणाले की तुमचे चुलते प्रभाकर मुळे व त्यांची पत्नी मुक्ताबाई मुळे या दोघांनी त्यांचे राहते घरात लोखंडी पाईपचे आडुला गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.त्यांनी घराकडे जाऊन पहाणी केली असता पती पत्नी साडीने बनवलेल्या दाव्याने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसले.
मयत वयोवृद्ध दाम्पत्यांना एक मुलगा व तिन मुली आहेत. मुलगा बांधकाम व्यावसायिक असुन शेतीही आहे.मात्र असे असतानाही त्या वयोवृद्ध दाम्पत्यांना आत्महत्येचा निर्णय का घ्यावा लागला याबाबत गावात चर्चिले जात आहे.
याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद घेण्यात आली आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.