अमरावती हिंसाचारप्रकरणी माजी मंत्री अनिल बोंडेसह भाजपच्या 60 कार्यकर्त्यांना अटक

 

त्रिपुरातील जातीय हिंसाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती येथे मुस्लिम संघटनांनी काढलेल्या रॅलीच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी भाजपने महाराष्ट्रातील अमरावती बंदची घोषणा केली होती. यादरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळच्या घटना घडल्या. आंदोलकांनी पोलिस आणि पत्रकारांवरही दगडफेक केली, या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण २५ FIR नोंदवले असून एकूण ६० जणांना अटक करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपचे उर्वरित कार्यकर्ते सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांचा शोध सुरू आहे. या शहरातील राजकमल चौक परिसरात शनिवारी सकाळी शेकडो लोक घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरले. यातील अनेकांच्या हातात भगवे झेंडे होते. जमावाच्या काही सदस्यांनी राजकमल चौक परिसरात दगडफेक केली आणि दुकानांसह गाड्या जाळल्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे.

अल्पसंख्याक समाजावरील अत्याचार थांबविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आठ हजारांहून अधिक लोक निवेदन देण्यासाठी जमले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. निवेदन देऊन लोक निघाले असताना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चित्रा चौक ते कॉटन बाजार दरम्यान तीन ठिकाणी दगडफेक करण्यात आली.

Team Global News Marathi: