‘अमोल मिटकरी यांच्या घरी लायसन होतं, त्यावेळी घासलेट चोरून विकायचे’

 

अकोल्यामध्ये सध्या राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे चित्र दिसून येत असून पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आरोप करणाऱ्या शिवा मोहोड यांचं चरित्र आणि चारित्र्य तपासावं, असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले. आता याला शिवा मोहोड यांनी प्रत्युत्तर दिले आहेत.मिटकरी हे ‘घासलेट चोर’ आहेत असा आरोप शिवा मोहोड यांनी केला आहे.

अमोल मिटकरी यांच्या घरी लायसन होतं, त्यावेळी घासलेट चोरून ते विकत होते. हे सगळे किस्से आम्हाला माहित आहेत. पण पक्षाची आचारसहिंता असते त्यामुळे मी काही बोलू शकत नव्हतो. पण माझ्या चारित्र्यावर संशय निर्माण करणाऱ्या या माणसाला मी जाहीरपणे आव्हान करतो की माझ्या चारित्र्याचा एक जरी पुरावा दिला तर मी भर चौकात फाशी घेईन. नाही तर त्याचं पातूरच्या महिला पदाधिकाऱ्याचं प्रकरण काय आहे असा सवाल देखील उपस्थित केला.

तसेच एका कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला १० लाख रुपये कशासाठी दिले? एका पुण्याच्या महिला पदाधिकाऱ्याचा अकोल्यातील रेस्ट हाउसमध्ये मुक्काम का होतो ? असे सवाल उपस्थित केले आहेत. केशवनगरमध्ये ८० लाख रुपयांचा प्लॉट कसा घेतला ? 30 लाखांची इनोव्हा कुठून आली ? माझ्या चारित्र्यावर संशय असणाऱ्या मिटकरी यांनी पुरावे द्यावेत अन्यथा १० दिवसात त्यांच्या घरासमोर मी पत्रकार परिषद घेवून यांचे कारनामे मीच जाहीर करणार आहे. असा इशारा मोहोड यांनी दिला आहे.

Team Global News Marathi: