लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या अध्यक्षपदी अमित कटारिया, सचिवपदी आदित्य कोठारी

लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या अध्यक्षपदी अमित कटारिया, सचिवपदी आदित्य कोठारी

बार्शी – शहरात सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केलेल्या आणि विविध उपक्रम राबवून गरजूंना मदत करणाऱ्या लायन्स क्लब बार्शी टाऊन कार्यकारिणीची निवड जाहीर झाली. त्यानुसार, २०२२-२३ च्या अध्यक्षपदी युवा उद्योजक अमित कटारिया, सचिवपदी आदित्य कोठारी तसेच खजिनदारपदी राजाभाऊ काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे..

या निवडीबद्दल ज्येष्ठ सदस्य अतुल सोनिग्रा,भरत परमार, डॉ. हरीश कुलकर्णी, रवी बजाज, ॲड-वासुदेव ढगे व सर्व सदस्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. लायन्स क्लब बार्शी टाऊनचे बार्शी तालुक्यातील गरजू रुग्णांसाठी अल्पदरात दर मंगळवारी मधुमेह तपासणी कोठारी लैब येथे.

 

आणि अल्पदरात किडनी विकारासाठी डायलिसिसची सुविधा सुश्रुत हॉस्पिटल येथे, तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर हे उपक्रम गरजू रुग्णांसाठीसाठी उपयुक्त ठरत असल्याचे कोठारी यांनी सांगितले. दरम्यान, तालुका स्तरावर होणारे महाराष्ट्रातील सर्वात मोठे लायन्स कृषी व व्यापार प्रदर्शन घेण्याचा मानसही नुतन अध्यक्षांनी व्यक्त केला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: