अमेय घोले यांच्या कार्याची दखल, सकाळ सन्मान पुरस्काराने सन्मानित

 

वडाळा विभागातील नगरसेवक अमेय अरुण घोले यांच्या कार्याची दखल थेट सकाळ या लोकप्रिय वृत्तपत्राने घेतली असून सकाळ समूहाकडून देण्यात येणाऱ्या सकाळ सन्मान पुरस्कार यंदा अमेय घोले यांनी पटकावला आहे. शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार अमेय घोले यांनी स्वीकारला आहे. मागच्या पाच वर्षात वडाळ्याच्या विकासात केलेल्या कार्याची पोचपावती म्हणूनच हा सन्मान त्यांना मिळाल्याचे बोलले जात आहे.

अमेय घोले यांनी मागील पाच वर्षात अनेक बदल आपल्या मतदार संघात केलेत. प्रभागातील तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांना वेळ न देता जागेवरच त्यावर तोडगा काढण्याचा त्यांच्या खास हातखंडा असल्याचे बोलले जाते मग तो पाणी प्रश्न असो कि आणखी कोणताही प्रश्न असो म्हणूनच त्यांची प्रभागात कार्यसम्राट अशी ख्याती आहे. आज संपूर्ण वडाळा झोपड्पट्टी मुक्त करण्यासाठी मोठा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राबवला जात आहे.

कोरोना काळात आरोग्य समिती अध्यक्ष पदावर असताना स्वतःच्या तब्येतीची कोणतीही पर्वा न करता मुंबईतील सर्व कोरोना रुग्णायाला भेट देऊन आरोग्याच्या दृटीने आढावा त्यांनी घेतला होता. प्रथम नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे असे म्हणाऱ्या घोले यांना दोन वेळा कोरोनाची लागण सुद्धा झाली होती मात्र त्यातून बाहेर पडल्यानंतर आराम न करता जनतेच्या सेवेत तात्काळ रुजू झाले होते.

कोरोना काळात रुग्णांना रक्ताचा पुरवठा कमी पडू नये म्हणून राबवलेले रक्तदान शिबीर, स्वतपासणी किताचे वाटप, घरोघरी प्रभागात इम्युनिटी पॉवर गोळ्या वाटपाचे काम, गरीब गरजू नागरिकांना रेशन वाटप तसेच प्रभागातील विध्यार्थी वर्गालाच लॅपटॉप आणि टॅब देऊन गुणगौरव सन्मान त्याचप्रमाणे विध्यार्थ्यांना भविष्यात नोकरी संदर्भात मार्गदर्शन मिळावे म्ह्णून मार्गदर्शन पुस्तकाचे वाटप असे अनेक उपक्रम अमेय घोले यांनी आपल्या प्रभागात राबवले आहेत याच कामाची पोचपावती त्यांना या सन्मानातून मिळाली आहे.

Team Global News Marathi: