आंबेडकरी चळवळीला भाजपने बदनाम केले, तसेच नक्षलवादी ठरविले – नाना पटोले

 

नांदेड | पुणे एकदा दलित आणि पीडित लोकांचे भारतीय जनता पक्ष शोषण करत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने लगावला आहे. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून वंचित, दलित, शोषित समाज घटकांवरील अत्याचार वाढले आहेत. या मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून बदनाम करण्याचे पाप केले, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पदग्रहण सोहळ्यात पटोले बोलत होते. कार्यक्रमाला बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री विश्वजित कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावर भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका काँग्रेस नेत्यांनी केली होती.

पटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यवस्थेला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर यांनी वंचित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले. देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो; पण हे संविधानच बदलण्याचे काम सुरू आहे.
काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये संधी मिळेत, हेच सिद्धार्थ यांना मिळालेल्या जबाबदारीने पुन्हा दाखवून दिले आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Team Global News Marathi: