अंबानींच्या घराबाहेर ‘सीन रिक्रिएशन’ वाझेंना सदरा घालून चालायला लावले

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांची एनआयएकडून अटक करण्यात आली होती. तसेच या चौकशीमध्ये अनेक खुलासे झालेले पाहायला मिळाले होते.

आता अंबानी यांच्या घराबाहेर घडलेल्या ठिकाणी सचिन वाझे यांना घेऊन जाण्यात आले होते. तिथे जवळपास दीड तास स्फोटके नेमकी कशी ठेवली गेली तसेच घडलेल्या घडामोडी हे समजून घेण्यासाठी NIA कडून ‘सीन रिक्रिएशन’ केले गेला. तसेच अंबानी यांच्या घराबाहेर गाडीतून PPE किट घालून बाहेर पडलेला व्यक्ती सचिन वाझे होता का याची चौकशी आता NIA ची टीम अंबानी यांच्या घराबाहेर घडलेल्या स्पॉटवर जाऊन करत आहे. काल रात्री ११;०० च्या दरम्यान घडलेल्या प्रकारचा सीन पुन्हा एकदा रिक्रिएशन करण्यात आला होता.

यावेळी NIA ने सचिन वाझे याला सदर CCTV फुटेजमध्ये दिसणारा व्यक्ती चालत असलेल्या जागेवरून पुन्हा एकदा चालायला लावले होते. या तपासातून CCTV फुटेजमधील व्यक्ती आणि सचिन वाझे यांच्या चालण्याची पद्धत याची तपासणी NIA करत होती.

सचिन वाझे यांना घटनास्थळी नेण्यात आलं. यावेळी एनआयएचे वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम उपस्थित होती. सुरुवातीला काही पॉइंट मार्क करण्यात आले आणि त्यानंतर आहे त्याच साध्या वेषात वाझे यांना चालण्यास सांगण्यात आलं. अशाप्रकारे तीवेळा त्यांना पुढे जाऊन मागे येण्यास सांगितलं गेलं

Team Global News Marathi: