घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी, घर प्रसन्न व आनंदी राहावे असे वाटते ना तर मग हे उपाय करून पहा..

घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी, घर प्रसन्न व आनंदी राहावे असे वाटते ना तर मग हे उपाय करून पहा..

दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वछ करून घ्यावे. घरातील फरशी रोज पुसावी , आणि त्यावेळी फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे…!!!

घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे. मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे…!!!

रोज घराचा उंबरठा पुसून स्वछ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले , स्वस्तिक किंवा जय श्री राम लिहून रांगोळी काढावी…!!!

दर १५ दिवसाला घरातील जाळे जळमट स्वछ करावे. घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात.घरातील सगळे पडदे दर २ महिन्याने धुवून घ्यावेत…!!!

घरामध्ये नेहमी मोकळी खेळती हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा , घर सतत बंदिस्त ठेवू नये…!!!

संध्याकाळी दिवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावी. घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचगवय धूप लावावी. रोज किमान १ माळी कुलदेवतेचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा. देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःला हि लावून घ्यावे. भीमसेनी कपूर जाळावा. देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान १५ मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील ह्याची काळजी घ्या. तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलाच व्हावं ह्यासाठी प्रार्थना करावी…!!!

दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी , तुळशीला हळदी कुंकू लावून शुभंकरोती म्हणावे तसेच आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी…!!!

ही लक्षणे देतात शरीरातील कमी ऑक्सिजनची पूर्वसूचना, दुर्लक्ष न करता, असा वाढवा ऑक्सिजन !

संध्याकाळी दिवे लागणीची वेळ असताना घरात झोपणे , भांडणे , नकारात्मक बोलणे, अपशब्द बोलणे किंवा TV वर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे…!!!

घरामधे कुठेही कचरा , धूळ राहू देऊ नये. तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये. रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे ,घरात नाही…!!!

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा कि घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात…!!!

माझ्या नावाने राजकारण करू नका- छत्रपती संभाजीराजे

घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावीत तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावावे…!!!

आपल्या घरात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये. शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी. पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा…!!!

घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी. रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे…!!!

पंढरपूरचे संत हभप रामदास महाराज जाधव यांचे कोरोनामुळे निधन

दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यावर ती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू वाहावे. त्यातील एक १०० रुपये देवाजवळीलच एका डब्यात जमा करावी. शक्य असल्यास सहा महिन्यांनी ह्या रकमेचे गरिबांना अन्नदान करावे.दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घेऊन यावे उदा. मिठाई. घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील ह्याची काळजी घ्यावी…!!!

घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे . घरामध्ये लागणाऱ्या वस्तू , किराणा, धान्य हे किमान ७ दिवसाचे , १५ दिवसाचे किंवा १ महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे , आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये…!!!

सलग चौथ्या दिवशी सोन्याचे भाव गडगडले; जाणून घ्या सोने-चांदी आजचे दर

घरामध्ये तुटलेले फर्निचर , चपला , बंद पडलेले घड्याळ , भंग पावलेल्या मूर्ती , रद्दी सामान ठेवू नये. घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वछ ठेवावे…!!!

घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये. अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले तरी तारांबळ उडू नये असे असावे…!!!

घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारी ठिकाणे “शौचालय , बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज अंघोळीच्या आधी स्वछ करून घ्यावे. घरातील स्वच्चतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावि . दरवेळी स्वचछतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्चतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने लावून घ्यावे…!!!

सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे कोरोनामुळे निधन

घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे , उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत. शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी. काही समस्या ह्या येणारा काळ सोडवतो. त्यामुळे सतत वाद होणार नाहीत हि काळजी घ्यावी…!!!

. घरामध्ये सगळे सण वार प्रथेप्रमाणे साजरे करावेत, कुलधर्म कुलाचार करत राहावा…!!!

आयुष्य सुंदर आहे. आनंदात जगा, आपला जिव्हाळा कायम राहो…!!!

स्वत: ची व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या व तसे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या…!!!

|| जागृत रहा,सतर्क रहा, सुरक्षित रहा||

ग्लोबल न्युज नेटवर्क: