राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त, पवारांचा मोठा निर्णय

राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त, पवारांचा मोठा निर्णय

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन कार्यकारणी कधी जाहीर होते आणि त्यात कोणाल संधी मिळते हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी एक पत्र सगळ्या सेलच्या प्रमुखांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांची सही असलेल्या या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या सेलच्या आणि विभागाच्या कार्यकारिणी बरखास्त केल्याचे म्हटले आहे. हा निर्णय देशपातळीवर लागू झाला आहे. मात्र, हा  बरखास्तीचा निर्णय घेण्यामागचे  कोणतेही कारण देण्यात आलेले नाही.

 

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या सगळ्या विभाग आणि सेलच्या कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र लगेच ते ट्विट डिलीट केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: