“अजितदादा शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे” भाजपच्या या मित्र पक्षाची ऑफर

 

राज्य शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये शक्तिप्रदर्शनाची चढाओढ सुरु असल्याचे दिसत आहे. यातच अजितदादा शिंदे-भाजपच्या युती सरकारमध्ये आले तर स्वागतच आहे, अशी खुली ऑफर रिपाइं नेते आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कॉपी करत राहुल गांधी पावसात भिजले तरी काँग्रेसला भिजवण्याची ताकद त्यांच्यात नाही. त्यामुळे त्यांना फारसा फायदा होणार नाही. तसेच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही भारत जोडण्यापेक्षा भारत तोडण्यासाठी यात्रा आहे. त्यामुळे काँग्रेसला बळ देण्याची ताकद ही राहुल गांधी मध्ये नसल्याचा घणाघात आठवले यांनी केला.

अजित पवार यांना पहाटे शपथ घेण्याची सवय असून त्यामुळे आम्ही केव्हा येऊ हे सांगता येणार नाही असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे. कदाचित अजित पवार इकडे येत असतील ते आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागत आहे, पहाटेचा शपथविधी घेऊन जे अजित पवारांना जमले नाही ते धाडस एकनाथ शिंदेंनी केले, असे रामदास आठवले म्हणाले.

Team Global News Marathi: