अजितदादा शरीराने वज्रमूठ सभेत, शिंदे गटाच्या नेत्याचा विधानाने खळबळ

 

आज मुंबई BKC मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. त्यावरून भाजपसह शिंदेंच्या गटातील नेत्यांनी मविआवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटलं की, या पूर्वी सुद्धा त्या मैदानावर बाळासाहेबांनी सभा घेतल्या आहे, त्या सभा सोबत आजची सभा बरोबरी करता येणार नाही. अजित पवार यांच्याबद्दल संजय शिरसाट यांनी धक्कादायक असं विधान केलं असून राज्याच्या राजकारणात चर्चेला नवा विषय दिला आहे. अजित पवार यांना आज सगळ्यात जास्त त्रास होत असेल, त्यांना सभेत खुर्ची आहे की नाही माहीत नाही. ते आले तर काय बोलणार माहीत नाही.

ते मनापासून सभेत नाही तर शरीराने असतील आणि ते मनातून कुठे असेल ते 4 दिवसात कळेल, सगळ्यांना दिसेल. अजित दादा सगळे विषय हसून खेळून टोलवतात आहे, याचाच अर्थ त्यांच्या मनात काहीतरी आहे ते निर्णय घेतील 100 टक्के. मविआचा केविलवाणा प्रयत्न तीन पक्ष येऊन आज गर्दी करताय आणि आम्ही सोबत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करताय. सभेमुळे महाराष्ट्र कुणाच्या मागे ते कळत नाही, सभेमुळे वातावरण बदलते हा समज चुकीचा आहे, शिवसेना प्रमुख मला म्हणायचे गर्दी होते मग मतदान का मिळत नाही, त्यामुळं फार लक्ष द्यायची गरज नाही.

पुढे बोलताना शिरसाठ म्हणाले की, सभेचा धुरळा उडणार नाही आणि थोडा बहुत उडाला तर आम्ही पाणी मारून शांत करू असंही त्यांनी म्हंटल. खैरेंच्या बोलण्याला किंमत नाही महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांचे भाषण न ऐकताच चंद्रकांत खैरे यांनी काढता पाय घेतल्यानं नव्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावरून संजय शिरसाट यांनी म्हटलं की, खैरे कशाला आले इथं कार्यक्रमाला. बकवास बोलणं बंद करून योग्य बोलावे.

त्यांच्या बोलण्याला कुठेही किंमत नाही. मंत्रिमंडळ बैठक संभाजीनगरात व्हायला हवी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मंत्रिमंडळ बैठक संभाजी नगरात व्हायला हवी या मताचा मी आहे. यातून मराठवाड्यावरील अन्याय दूर होतो त्यामुळे ही बैठक व्हायला हवी यासाठी मी प्रयत्न करेल यावेळी 17 सप्टेंबर ला संभाजी नगर मध्ये कॅबिनेट बैठक होईलच. भाजप आणि आम्ही मुस्लिम विरोधक नाही, शिवसेना प्रमुख आणि मोदीजी दोघेही मुस्लिम विरोधक नाही.अनेक तरुणांची माथी दहशतवादी भडकवतात ते थांबले पाहिजे म्हणून घेतलेली ही भूमिका आहे असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं.

Team Global News Marathi: