अजितदादा मनसे नगरसेवकांवर बरसले, लांबूनच बोल आमचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह….!

अजितदादा मनसे नगरसेवकांवर बरसले, लांबूनच बोल आमचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह….!

राज्यात कोरोनाचे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आज अनेक मंत्री, खासदार आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार मनसे नगरसेवक सचिन चिखले यांच्यावर चांगलेच भडकलेले दिसले. आमचे चार मंत्री पॉझिटिव्ह आले आहेत. लांबून बोला.

फिजिकल डिस्टन्स ठेवण्यावरून मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांना पवारांनी खडेबोल सुनावले. मात्र, एवढीच काळजी होती तर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा लवाजमा बोलवलाच कशाला? ऐकूनच घ्यायचं नव्हतं तर निमंत्रण दिलंच कशाला? असा सवाल आता नगरसेवक सचिन चिखले यांनी केला आहे.

एवढंच नाही तर अजित पवारांच्या वर्तणुकीवरही नाराजी व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते . त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जम्बो कोव्हिड सेंटरच्या नियोजित स्थळाची पाहणी केली.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने महापालिकेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांनाही आमंत्रित केलं होतं. त्यानुसार आपण प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची माहिती देण्यासाठी, कोरोनाबाधितांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती देण्यासाठी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हेही उपस्थित होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: