‘अजित पवारांनी ज्या पद्धतीनं पुण्याची वाट लावलीय, ते बघता…’ निलेश राणे यांनी साधला निशाणा !

 

पुणे महापालिकेची सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारकाईनं लक्ष घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळं विरोधकांनी अजित पवारांना लक्ष करण्यास सुरवात केली आहे.

सध्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी पुण्यातील प्रश्नांमध्ये जातीनं लक्ष घालायला सुरुवात केली आहे. पुणे मेट्रोची ‘ट्रायल रन’ नुकतीच अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडली. त्या कार्यक्रमाला भाजपच्या नेत्यांना आमंत्रण नसल्यामुळं राजकारण रंगलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

आता याच मुद्द्यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली आहे, पुण्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी किती वर्षे लागतील हे कुठला अर्थतज्ञ सुद्धा सांगू शकणार नाही. अजित पवारांनी पुण्याला कोंडून ठेवलं आणि अर्थमंत्री असून सुद्धा त्यांना अर्थव्यवस्था हाताळता आली नाही. असा टोला लगावला आहे.

 

Team Global News Marathi: