अजित पवारांच्या सभेत कोरोनाच्या नियमांना दाखवण्यात आली केराची टोपली !

राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढला आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सण, उत्सव, राजकीय सभा तसेच लग्नसभारंभ यांच्यात जमणाऱ्या गर्दीवर बंधने आणली आहेत.

मात्र ही बंधने फक्त सामान्य नागरिकांना असतात का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपुरातील कार्यक्रमात चक्क कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात आल्याचे चित्रं दिसून आले आहे. या सभेतील नेत्यांच्या व पदाधिकारी यांच्या तोंडाला मास्क नसल्याचेही पहावयास मिळाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी दोन दिवसाच्या दौर्यावर आले आहेत. गुरूवारी सकाळी त्यांनी पंढरपुरात जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत भाजपचे नेते कल्याणराव काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमात नियम पाळले जात नसतील तर सर्वसामान्य लोकांनीच नियम पाळावे का ? त्यांनीच दंड भरावा का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

Team Global News Marathi: