“अजितदादांची सीबीआय चौकशीची मागणी हा भाजपचा ‘प्लॅन ‘बी’ “

 

मुंबई | भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत अजित पवार व अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा आणि त्यासाठी आधार काय? तर जो अधिकारी आरोपी असून अटकेत आहे त्याने बेछूट आरोप केलेले पत्र. आरोपी म्हणून अटकेत असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्राच्या आधारावर सीबीआय चौकशीची मागणी कशी केली जाऊ शकते? असा संतप्त सवाल आजच्या सामना अग्रलेखातुन खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

भाजपच्या कार्यकारी बैठकीमध्ये अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव मांडण्यात आल्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा पेटले होते. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर बेछुड आरोप सुद्धा लागले होते. याच मुद्यावरून संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना कोण ओळखत नाही! त्यांच्या भ्रष्टाचारविरुद्ध चळवळीने भल्याभल्यांची झोप उडवली. दमानिया यांनी सांगितले आहे की, ‘अविनाश भोसले यांची मालमत्ता ‘ईडी’कडून सील हा फक्त अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे काय?’ कारवाई सरळ मार्गाने व्हावी, पण ईडी हे सर्व भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे. दमानियांचे म्हणणे असे, ”अविनाश भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहीत आहे असा प्रश्न सुद्धा दमानिया यांनीं उपस्थित केला होता.

Team Global News Marathi: