अजित पवारांकडून एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचं पाच शब्दांत प्रतिउत्तर

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा चांगलाच गाजला असून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येत असतानाच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अजित पवार यांनी मोजक्या शब्दांत एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची समीक्षा केली.

अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव थेटपणे घेणे टाळले. पण काहींची भाषणं नको इतकी लांबली. कोणाची ते तुम्ही ठरवा, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यांच्या या खोचक टीकेचा रोख एकनाथ शिंदे यांच्या दिशेने असल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांनी गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी अजित पवरांना दसरा मेळाव्यातील भाषणांविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केलेले अनेक मुद्दे खोडून काढले. आता महाराष्ट्रातील मतदारांनी आणि शिवसैनिकांनी निर्णय घ्यायचा आहे. कोणाच्या पाठिशी उभं राहायचं? मूळ शिवसेना पक्ष कोणाचा आहे?, याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे.

तसेच एकनाथ शिंदे हे आमच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा माझ्या उजव्या बाजूलाच बसायचे. पण तेव्हा झेंडा आमचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा ही भावना त्यांनी कधी बोलून दाखवली नाही. अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने जे काही निर्णय घेतले ते सगळ्यांनी मिळून घेतले, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Team Global News Marathi: