“अजित पवार घोटाळा, १८४ कोटी बेनामी संशयास्पद व्यवहार” सोमय्यांचे सूचक ट्विट

 

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्यसरकारमधील अनेक नेत्यांवर घोटाळे केल्याचे आरोप केले आहे. त्यापैकी अनेकांवर ईडीने कारवाई सुद्धा करत कारवाई केली आहे. तसेच सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा लक्ष केले आहे नुकतेच आयकर विभागाकडून अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालक तसंच नातेवाईकांच्या घरावर छापेमारी कारवाई करण्यात आली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत अजित पवार घोटाळा असा उल्लेख केला आहे.

 

किरीट सोमय्या आपल्या ट्वीट म्हणाले की, अजित पवार घोटाळा, ९ दिवसांचे आयकर छापे, मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर… ७० ठिकाणी छापे, १००० हून अधिक कोटींचे जमीन, सदनिका, ऑफिस, साखर कारखाने…., कोट्यवधी रुपये रोख आणि ज्वेलरी, 184 कोटी बेनामी संशयास्पद व्यवहार असे ट्वीट त्यांनी आज केले आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

प्राप्तिकर विभागाने काही दिवसांपूर्वी मुंबईतील दोन रिअल इस्टेट समूहांवर छापा टाकला होता. यावेळी तपासादरम्यान काही कागदपत्रे जप्त केली होती. तसेच, या समूहांशी संबंधित काही व्यक्तींचीसुद्धा चौकशी करण्यात आली होती. यामध्ये १८४ कोटींची बेनामी संपत्ती समोर आल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळातर्फे सांगण्यात आले. तसेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळातर्फे असेही सांगण्यात आले की, यामध्ये महाराष्ट्रातील एका प्रभावशाली कुटुंबाचाही सहभाग आहे.

Team Global News Marathi: