“अजित पवारांच्या संबंधित घोटाळ्याचे कागद ईडीला पाठवणार”

 

राज्यात तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते किरीट सोमय्या हे सरकारमधील नेत्यांचे अनेक घोटाळे बाहेर काढत आहेत. त्यांनी आता आपला मोर्चा पवार कुटुंबाकडे वळविला आहे. ‘उपमुख्यमंत्री पवारांनी आपल्या बहिणींबद्दल खोटी माहिती दिली आहे. त्यांच्या बहिणीच्या नावे संपत्ती आहे. अजित पवार व त्यांच्या बहिणींच्या नावे असणाऱ्या बेनामी संपत्तीचे, घोटाळ्याचे चोपडे उद्या ईडी, सहकार विभागाला पाठवणार आहे. यातला एकपण कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, रोहित पवार यांनी मला सिद्ध करून दाखवावे,’ असे चॅलेंज सोमय्या यांनी दिले.

भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार माध्यमांशी ते म्हणाले की, ‘आयकर विभागाने राज्यातील पाच साखर कारखाने यांवर छापा टाकला. यात जरंडेश्वर साखर कारखाण्याचाही समावेश आहे. अजित पवार यांनी त्यांच्या बहिणीच्या नावे अनेक कंपन्या सुरु केल्या आहेत. तरीही ते खोटे बोलत आहेत कि माझ्या बहिणींचा काहीही सबंध नाही.

मात्र वास्तविक खरी गोष्ट हि आहे कि, जरंडेश्वर कारखान्यात अजित पवारांच्या बहिणी भागीदारी आहेत. २७ हजार शेतकऱ्यांचे प्रतिनिधी माझ्याकडे जरंडेश्वर कारखान्याच्या भेटीवेळी माझ्याकडे आले होते कि अजित पवार जनतेला लुटतायत. आमचा कारखाना अजित पवारांनी घेतला. आणि बेनामी ठेवला अशी टीका यावेळी त्यांनी केली होती.

Team Global News Marathi: